I love my perfectly imperfect life (My first award winning blog)

#माझ्यातलीआईआणिबरेचकाही

माझं आयुष्य म्हणजे तो graph असतो ना, cardiac मशीनमधे कायम हृदयाची धडधड दाखवतं राहतो. खालीवर चढत राहतो, तसंच काहीसं आहे. जीवनात बरेचसे उतारचढाव पाहिलेत. श्रावण महिन्यात जसा ऊन पावसाचा खेळ सुरु असतो तसंच आयुष्यभर सुखदुःख येतं जात राहत. मी ही खूप यशापयश पाहिलेत, खूप चुकाही केल्यात, खूप मित्रमैत्रिणी बनवले, खूप गमावले ही. मी perfect नाही उलट I am perfectly imperfect. मला वाटतं कुणाचीच life perfect नसते आणि एखाद्याची असेलही तर त्याच्यासारखा कमनशिबी दुसरा कुणीही नाही. आयुष्याची खरी मजा आहे, almost सुटणारी ट्रेन धावत शेवटच्या क्षणी पकडण्यात तर कधी वर्षभर अभ्यास न करता परीक्षेच्या आधल्या रात्री night मारून paper पास करण्यात. मैत्रिणींशी lectureमधे वहीच्या शेवटच्या पानावर गप्पा मारण्यात तर कधी उगाचंच भांडण काढून नवऱ्याला छळण्यात.एखाद्या उनाड दिवशी फ़क्त एकटंच फिरण्यात, बाथरूममधे गाणं म्हणत नाचण्यात आणि स्वतःच स्वतःचे प्रेक्षक बनून आरश्यात बघून स्वतःची तारीफ करण्यात. अशीच काहीशी आहे मी.आयुष्य कसं यश आणि अपयश, प्रेम तर कधी heartbreaksने भरलेलं असावं. यशाची किंमत अपयशानंतरच कळते. एखाद्या लांब काळरात्रीनंतरच प्रकाशाची किंमत समजते. बालपणी मी ह्याच्या खूप विपरीत होते. ढम्म, सुस्त, घुमी ही विशेषण शोभेल अशी. माझी आई जिल्हा परिषदमधे शिक्षिका असल्यामुळे जास्तीत जास्त बालपण खेड्यात गेलं. आईची सतत होणारी transfer, मग दरवेळी नवीन गाव, नवीन शाळा, नवीन मैत्रिणी. मला खूप कठीण जायचं नवीन मैत्रिणी बनवायला. थोडी घट्ट मैत्री होतं आली की लगेच उचला सामान आणि चला दुसऱ्या गावाला. आईची प्रकृती खुपच खराब रहायची नेहमीच त्यामुळे घरातले कामं करायची सवय आधीपासूनच. तीने सगळी कामे कधीच माझ्यावर थोपवली नाही पण प्रकृती खराब, शाळा सांभाळने, शाळेतली मुलं आणि घरकाम हे सगळं संभाळून तिची दमछाक व्हायची आणि मग घरी चिडचिड. माझी बहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान. आईची नोकरी आणि आजारपण ह्यामुळे तिची जबाबदारी माझ्यावर नकळत आली. ती खेळायला गेली तर तिच्यावर लक्ष ठेवणे. शाळेत तब्येत बिघडली तर घरी आणणे आणि इतर बरीच काम माझ्यावर पडली. एका तऱ्हेने मी माझ्या लहानपणीचं तिची आई झाले. जबाबदारीने वागण्याची सवय लहानपणीचं लागली.

नंतर नंतर आईच्या transfersची सवय झाली त्यामुळे इतकं वाईट वाटणं बंद झालं. पाळी इतर मुलींच्या तुलनेत लवकरच सुरू झाली आणि होतं नव्हतं ते बालपण हिरावून गेल्यासारखं वाटलं.महिन्याचे पाच दिवस bleeding ते ही भरपूर आणि पोटपाय खूप दुखायचे. आई स्वतः कापड वापरायची म्हणून तीने मलाही तेच सांगितले. pads होते तेव्हा पण वापरण्याचा confidence पण नव्हता आणि ते परवडणारही नव्हते. ते कापड कडक व्हायचे, मग त्यामुळे मांड्या घासल्या जायच्या. जखम होऊन चालणंही कठीण व्हायचं. त्यात शाळा दूर, पायी किंवा सायकलने जायचे. पाळीत असतांना PTच्या period मधे मी active नाही राहायचे इतर मुलींसारखी त्यामुळे सर रागवायचे,पण त्यांना काय सांगणार? शरीराने उंच आणि धडधाकट असल्यामुळे पाचव्या वर्गापासूनच कधी लोकांच्या घाणेरड्या नजरा तर कधी “चमक चम चमके अंगुरी बदन” असल्या अश्लील, घाणेरड्या comments ऐकायला मिळायच्या.पण दरवेळी नवीन शाळा, नवीन मैत्रिणी आणि असल्या कठीण परिस्थितीतूनच मी नव्याने जन्माला आले असं मला वाटतं. मी जर अनुकूल परिस्थितीत वाढले असते तर लहानपणी होते तशीच घुमी आणि एकटीएकटी राहणारी राहिले असते कदाचित.माणूस जितक्या प्रतिकूल परिस्थितीत राहतो तेवढच त्याचं व्यक्तिमत्व उजळून निघतं ह्या मताची मी आहे.एखादं मातीचं भांड जसं भट्टीत भाजून आणखी मजबूत होतं तसंच काहिसं. तसंच माझही झालं, आणि मी extrovert, straight forward व्यक्तिमत्वाची झाले. मी सातवीत असतांना, एकदा bus मधे चढतांना असाच एक माणूस मला नको तिथे स्पर्श करतं होता तर मी त्याला मोठ्याने, सगळ्या लोकांसमोर झाडले त्यामुळे तो त्या बस मधे मग चढलाच नाही. तेव्हापासून मी ठरवलं की गप्प बसायचं नाही. मला नवीन व्यक्तीसोबत बोलण्यात, मैत्री करण्यात जो संकोच होता , तो हळूहळू कमी झाला. आता माझ्या भरपूर मैत्रीणी आहेत.

आधीच शिक्षण खेड्यात आणि मराठी mediumमधे झालेलं. अचानक नववीत शहरातल्या शाळेत आले, english mediumला. खेड्यात वर्गात पहिल्या तीन क्रमांकात येणारी मी शहरात english कळतं नसल्याने मागे पडतं गेले. शहरातल्या मुलींसारखं englishमधे तर सोडाच पण धड शुद्ध मराठीतही मला बोलता येई ना. मी परत खूप upset रहायला लागले. अभ्यासात मन लागे ना. एकवेळ अशीही आली होती की आपल्याला शिक्षण जमणारच नाही असे वाटले. माझ्या आईला माझी घालमेल कळतं होती. तीने तर माझ्याही पेक्षा आयुष्यात struggle केला आहे. चार वर्षांची असतांना तीने तिची आई गमावली. गरिबीतून एक साडी रोज घालून, मीठभाकर खाऊन शिक्षण पूर्ण करुन, नोकरीला लागली. तीने मला “कोल्हाट्याच पोरं” पुस्तक वाचायला आणून दिले. मी अक्षरशः ते पुस्तक वाचून रडले. येवढ्या कठीण परिस्थितीही शिकून डॉक्टर झालेले किशोर शांताबाई काळे ह्यांची ती कथा आहे. त्यातून मला नवीन बळ मिळाले. ते अश्या परिस्थितीतही डॉक्टर होऊ शकतात मग त्यामानाने आपल्याला तर देवाने भरपूर दिलंय. हा विचार करतं अभ्यासाला लागले आणि दहावीत 77%आणि बारावीत 87%नी पास झाले. पुढे entrance देऊन reputed government engineering college मधे admission मिळविली.

लग्नाच्या एक वर्षानंतर नवीन परिक्षा सुरू झाली. आम्हा दोघांनाही लवकर मुलं हवे होते म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न करत होतं. आधीचं एक वर्ष, होईल आज ना उद्या , असं म्हणत गेलं. पण असं म्हणता म्हणता दोन वर्ष, चार वर्ष, सात वर्ष गेली पण पाळणा हलला नाही. नातेवाईकांच्या प्रश्नांनी भंडावून सोडले होते. सगळ्या test दरवेळी व्हायच्या आणि दोघांचेही reports normal यायचे. डॉक्टर्स त्याला “unexplained infertility” नाव द्यायचे. सगळं व्यवस्थित असतांना कुठे अडत होतं तेच कळेना. हळूहळू मी depressionमधे गेले. लोकांशी बोलणं, भेटणं कमी केले.ovulation monitoring kit वरून आमच्या contactचे दिवस ठरू लागले. मशीन असल्यासारखे आणि contact ठेवणेही एक काम असल्यासारखे वाटायला लागले. पाळीची तारीख जवळ यायला लागली की धडधड वाढायची.पाळी आली की रडू यायचं. त्यावेळी असा एकही दिवस नसेल की मी रडली नसेल, कधी मनात रडायचे तर कधी डोळ्यांतून पण रडायचे हे नक्की. डिप्रेशनमुळे काहीही, कधीही, कितीही प्रमाणात खाणे सुरू झाले. वजन वाढत गेले. तेव्हा नवऱ्याने एक दिवस Friends ह्या english TV series ची CD आणली. एक episode बघितला नंतर दूसरा असं करतं एका रात्रीत पूर्ण season पाहून टाकला. त्या रात्री मी बऱ्याच वर्षांनंतर इतकी हसले. माझ्या मैत्रिणींची खूप आठवण आली तेव्हा.hostel मधले कीस्से ही आठवले आणि मी स्वतःही कशी होते नि हे स्वतःच काय करुन घेतलय ह्याची जाणीव झाली. त्या रात्री स्वतःचीच खूप आठवण आली. तेव्हा आम्ही Englandला राहत होतो. मग facebookवर active झाले. मैत्रिणींशी बोलायला लागले. इथेही नवीन मैत्रिणी बनवल्या. gym न लावता रोज 5km walk आणि योगा करुन बारा किलो वजन कमी केले. स्वतःवर लक्ष देऊ लागले. कधी मैत्रिणींसोबत तर कधी एकटीच परक्या देशात आत्मविश्वासाने फिरायला लागले.books वाचण्यात मन रमवले.भारतात येऊन treatment continue केली.इतर गोष्टीत मन रमविले. ME ला admission घेतली, job केला, guitar class join केला.माझ्या नशिबाने मला doctor खूप छान मिळाले. त्यांनी माझ्या शरीरावर औषधांचा भडिमार केला नाही naturally conceive होईल असं ते म्हणायचे. पण मग शेवटी लग्नानंतर सात वर्षांनी IVF करायचा निर्णय घेतला. मला वाटतं ह्या treatments तेव्हाच successful होतात जेव्हा आपण positive असतो. Mental health is the most important thing to conceive the healthy child. त्या period मधे positive राहण्यास ‘ the secrets’ हे मैत्रिणीने सुचवलेले book वाचले.माझे पहिलेच IVF successful झाले. पण ही फक्त अर्धीच लढाई संपली होती. गर्भ टिकून राहणेही तितकेच महत्वाचे असते. tension यायचं नाही असं नाही पण मी त्याकाळातही बरीच पुस्तके वाचली. आणि शेवटी मी एका सुंदर, गोंडस मुलीची आई झाले. त्यानंतरही बरेच problems आले. अंगावर दूध नव्हते, formula milk वाटीचमच्याने feed करणे. बाळाला वाटी चमच्याने पाजणे, त्यांना ते जमत नाही, भूक होतं नाही, त्यामुळे ते खूप रडत. दरवेळी वाटी चमचा पाण्यात उकळून घेणे, कुठे बाहेर जायचं असल तर मोठा प्रश्न.ते दूध पचायच नाही म्हणून ती खूप उलट्या करायची,हडकुळी दिसायला लागली. ह्या सगळ्या परिस्थितीमधेही आईच्या आणि बहिणीच्या मदतीने मी खंबीर राहिले.

बाळ झाल्यामुळे नोकरी सोडली होती. त्यामुळे दिवसभर घरी राहून परत मन खजील व्हायचं. पण बाळ टाकून बाहेर जायचंही नव्हतं. घरच्यांच्या आणि मित्रमैत्रिणीच्या प्रोत्साहनाने मी लिहिण्यास सुरुवात केली. माझं लिखाण लोकांना बऱ्यापैकी आवडतं. पुण्यात दोन तीन कार्यक्रमांमध्ये माझ्या कविता सादर करण्यात आल्या आहेत. काही कविता viral ही झाल्या आहेत. momspresso join करुन थोडेच दिवस झालेत पण खूप छान प्रतिसाद मिळतोय. सध्या मी Englandला राहत असून full time homemaker आहे. जे बालपण मला माझ्या लहानपणी जगता आलं नाही ते माझ्या मुलीसोबत मला आता जगायला मिळतंय. एका तऱ्हेने आई होऊन पुन्हा नव्याने जन्माला आल्यासारखं वाटतय .आम्ही दोघी मस्त फिरतो,कधी gardenमधे तर कधि beachवर. काही mother-toddler groups join केले आहेत. libraryत जातो. माझ्या मुलीच्या रुपात मला एक नवीन मैत्रीण लाभली आहे. तिच्या सोबत बालगीते म्हणते. busमधून आम्ही “wheels on the bus” गात जातो. माझ्याप्रमाणेच तिला पुस्तके, गायन आणि नृत्याची आवड आहे हे आतापासूनच जाणवतंय. मी गाणं शिकू शकले नाही पण तिला मला शिकवायचे आहे. माझे पतीही गरिबीतून शिकून पुढे आलेले आहेत. त्यांचं काम खूप hectic असतं त्यामुळे मला माझा पूर्ण वेळ मुलीला द्यावा लागतो. बऱ्याचदा ते सहा-सहा महीने विदेशात असतात तर आम्ही भारतात. तेव्हा मला आई आणि बाबा ह्या दोन्हीही भूमिका साकाराव्या लागतात. सध्या मी 31वर्षांची आहे. मला अजूनही असं वाटतं नाही की मी काही विशेष केलं आहे. माझं स्वप्नं आहे की मी खूप सुंदर कादंबऱ्या लिहाव्यात. साहित्य क्षेत्रात सध्या बालगीते हा सगळ्यात दुर्लक्षित विभाग आहे. मराठीत बालगीते आहेत पण त्यात आता नवीन म्हणावी तशी भर होतं नाहीये. त्याकडे ही लक्ष्य द्यायचं आहे. काही बालगीते लिहिली आहेत. योग्य वेळी ते momspresso वर टाकेल. भारतात परतून मुलीकडे लक्ष ठेवून करता येईल असा व्यवसाय करुन नवऱ्याला संसारात हातभार लावावा. अधूनमधून वृक्षारोपण, रक्तदान करते. वृक्षारोपण करण्यास जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न लेख लिहून करते. आपल्या पुढच्या पिढीसाठी सुंदर आणि शुद्ध वातावरण तयार करणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. त्या दिशेने मी माझा प्रवास भारतात आल्यावर सुरू करेल.

कठीण प्रसंग येऊन गेलेत, येतं आहेत अजूनही येतील पण ह्या सगळ्यांवर हसून मात करता आली पाहिजे. शेवटी आयुष्य म्हणजे cardiac machine मधला graphच आहे. खाली वर होतंच राहणार.जिथे तो सरळ होईल तिथे आयुष्य संपलेलं असत. पण तुम्ही कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे रहायला शिकलात की काहीच वाटत नाही. आपलं काहीच नीट होतं नाहीये असं वाटलं की आपल्यापेक्षा खालच्या प्रतीचे आयुष्य जगणाऱ्यांचा विचार करावा, मग आयुष्य सोपं वाटतं. देवाने आपल्याला सगळे अवयव नीट दिलेत, दोन वेळच खाणंपिणं, डोक्यावर छत हे सगळं दिलंय. काही लोकांच्या नशिबात तेही नसतं हा विचार केला की जगणं सोपं होतं. कुठल्याही यशस्वी व्यक्तीच आत्मचरित्र उचलून वाचा एक शब्द common दिसेल तो म्हणजे ‘संघर्ष’ . त्यांचा प्रवास कधीच सोपा नव्हता पण त्यातून ते अजून नव्या उमेदीने पुढे येऊन आपआपल्या क्षेत्रात यशस्वी झाले.कधीकधी आपण जी गोष्ट मिळतं नाही तिच्या मागे धावत राहतो आणि मग आपल्याजवळ जे आहे ते ही गमावून बसतो आणि मग पश्चात्ताप करतं बसतो. माझं बऱ्याचदा असं झालंय. जे नाही ह्या पेक्षा जे आहे त्यावर लक्ष्य केंद्रित केलं तर अजून मिळतं जात. प्रत्येक व्यक्तीमधे दोन व्यक्तिमत्व लपलेली असतात एक positive आणि दुसरी negative. संकटाच्या घडीला ही दोघे एकमेकांशी खूप भांडतात आणि मनात कल्लोळ उठवतात, confuse करतात. तर ह्या युध्दात positive व्यक्तिमत्व जिंकेल की negative हे आपल्याच हाती असतं. आपल्यातल्या positive व्यक्तिमत्वाला खतपाणी घालून चांगलं strong करायचं म्हणजे तो negative व्यक्तिमत्वाला हरवू शकेल. खतपाणी म्हणजे काय? तर वाचन, हास्यविनोद, आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तींशी संवाद, व्यायाम हे सगळं देवून positive व्यक्तिमत्वाला बळकट केलं की negative व्यक्तिमत्व लगेच त्यासमोर हार मानत.

शेवटी येवढंच म्हणेल, I am living my perfectly imperfect life and I am in love with it.

Leave a comment